Ticker

6/recent/ticker-posts

एस .आर.आर. इंग्लिश मीडियम सप्तरंग महोत्सव

 


होळनांथे .

                  दि.6-3-2024 रोजी होळनांथे येथिल अजंदे बुद्रुक या ठिकाणी असलेल्या एस. आर. आर. इंग्लिश मीडियम स्कूल यांनी सालाबादप्रमाणे याही  याही वर्षी सप्तरंग महोत्सव 2चे आयोजन केले होते.या प्रसंगी कार्यक्रमासाठी शिरपूर नगरीचे नगराध्यक्ष माननीय भाई सो भूपेश भाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादासो देवराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासो के डी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच अजंदे बुद्रुकचे माजी सरपंच व आजी उपसरपंच काकासो चंद्रकांत धोंडू पाटील,  विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश भाऊसाहेब,  अजंदे बुद्रुक चे सर्व ग्रामपंचायत आजी व माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते वीरूपाल सिंग राजपूत, खेडोपाड्यातील समस्त मंडळी, अजंदे गावचे पोलीस पाटील, आधी उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलाने  करण्यात आली. कार्यक्रमात एकूण 17 नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात लिली फुट आणि सोळा मिनिटांमध्ये संपूर्ण रामायण दाखवण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे चेअरमन श्री राजेंद्र सिंग राजपूत व सौ विजया राजपूत, प्रिन्सिपल रामसर, स्कूल इन्चार्ज सचिन सर, सचिन पाटील सर, कुलदीप सर, माधुरी पाटील, प्रतीक्षा सोनवणे, मीना मराठी, दिव्या कोळी, भक्ती पाटील, विशाल राजपूत यांनी उत्कृष्ट असे नियोजन केलेले होते. तसेच सप्तरंग महोत्सव दोन या कार्यक्रमाप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व आपले नृत्य सादर केले. समस्त ग्रामस्थांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.