Ticker

6/recent/ticker-posts

कार व ऑटो ची समोरासमोर धडक चार जखमी


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी

दि 23/3/24 दुपारी 3 वाजता सविस्तर वृत्त असे की स्विफ्ट कार क्रमांक MH29 BP5485 ही दारव्यावरून कारंजा कडे येत असताना ऑटो क्रमांकMH 16AJ8026 याची सावंगी  फाट्याजवळ समोरा समोर धडक होऊन चार गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी हे  कारमधील वानखडे कुटुंब आहे व ऑटो मधून धामणगाव देव येथील आहेत. अपघाताची माहिती  सिव्हिल इंजिनिअर चंद्रकांत वानखडे   यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज त्यांच्या रुग्णवाहिका चालक नितीन पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. व तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. जखमी रुग्णाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र बोधेगाव येथे प्रथम उपचार करून पुढील उपचार कारंजा येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पोहोचून दिले. त्यावेळी रुग्णांच्या मदतीसाठी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचे रुग्णसेवक नितीन पाटील व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख त्यावेळी मदत केली.