बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
वसंतराव नाईक प्रतिष्ठान शेतकरी कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ येथे मा. श्री. माणिकराव कदम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष व मा.श्री. बाळासाहेब कामारकर जिल्हा अध्यक्ष यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष पदी ॲड. राजीव भांगे पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच श्री. संजय लुटे पाटील जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा अध्यक्ष श्री. गजानन चंद्रवंशी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अमोल पाटील हरणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. विकास पारध यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित असलेले शेतकरी बंधू श्री. शंकर ढोकणे, श्री. ज्ञानेश्वर राठोड, श्री. कामाजी तिडके पाटील, श्री. शिवप्रसाद कोकाटे, श्री. संदीप भांगे, श्री. विठ्ठल भांगे पाटील, श्री. गोविंद राठोड, श्री. पांडुरंग राठोड, श्री. गजानन राठोड, श्री. गोमाजी कांबळे, श्री. श्याम सावळे, श्री. नितीन नरवाडे, श्री. संतोष आबाळे, श्री. गणेश मंदाडे, श्री. गजानन ढोकणे उपसरपंच पोखरी, गजानन घाटफोडे पाटील माजी उपसरपंच, श्री. बापूराव शेवाळकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट हा पक्ष सर्व शेतकरी यांचा विकास करणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे मा. श्री. धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे वतीने शेतकरी हिताचे खूप काही निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान आघाडी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. राजीव भांगे पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसान आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांनी सर्व शेतकरी बांधव यांना केले आहे. तसेच ॲड. राजीव भांगे पाटील यांनी मला उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करीन व शेतकरी हितासाठी अहोरात्र काम करीन असे मनोगत व्यक्त केले.





Social Plugin