पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
महाराष्ट्र शासन ने हर घर में जल हर गाव जल पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी जलजिवन योजना सुरू करण्यात आली परंतु खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील गेल्या काही महिन्यांपूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू झालेले काम अर्धवट पडल्यामुळे गावकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत मरकळ चरोली कोयाळी धानोरी सोळू या परिसरातील मोठ्या निधीची योजना अमलात आल्यानंतर यंदा पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु विविध कारणांमुळे जलजीवनची ही नळगंगा योजना पुढे सरकायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही योजना सुरू करण्यासाठी मध्यस्थी केलीहोती. त्यानंतरसुद्धा ही योजना सुरू झाली. अर्धवट नळ योजना झाल्यानंतर यापुढील निधीचा पैसा अपुरा पडल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीला या नळयोजनेच्या कामाचा विसर पडल्यामुळे योजना थंडबस्त्यात अडकली आहे. त्यामुळे यावर्षीही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ही योजना त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामपंचायत ची ग्रामस्थांची मागणी होत आहे





Social Plugin