Ticker

6/recent/ticker-posts

सौ.कमलबाई रमेश वडगांवकर (कर्नावट) यांचे दुःखद निधन



आळंदी प्रतिनिधी 

सौ.कमलबाई रमेश वडगांवकर (कर्नावट )वय ८२ वर्षे यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दिनांक १२/३/२०२४ रोजी सायं. ४ वाजता दुःखद निधन झाले. त्या धार्मिक, शांत स्वभावी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणाऱ्या, कुटुंबाबरोबरच समाजहित जपणाऱ्या होत्या. त्या रमेश धनराज वडगांवकर (कर्नावट) यांच्या धर्मपत्नी व उद्योगपती संजय वडगावकर यांच्या मातोश्री असून खेड तालुक्याचे मा. आमदार स्वर्गीय ताराचंद हिराचंद वडगांवकर यांच्या सुनबाई , सुरेश वडगांवकर  मा. नगराध्यक्ष आळंदी,अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, अध्यक्ष जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ आळंदी देवाची यांच्या भावजय, शारदा वडगांवकर मा.नगराध्यक्षा यांच्या जाऊबाई, अजित सुरेश वडगावकर सचिव श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या चुलती, मनीषा वडगावकर मा.नगरसेविका यांच्या चुलत सासू आहेत. सौ. कमलबाई रमेश वडगांवकर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी आपली दृष्टी दान केली आहे.

 त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती रमेश वडगांवकर, मुलगा उद्योगपती संजय वडगांवकर, सुनबाई ललिता ,मुली रंजना शिंगवी, वंदना शिंगवी, नातू साहिल, नात स्नेहल असा परिवार आहे. अंतयात्रा बुधवार दि.१३/३/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघेल.