Ticker

6/recent/ticker-posts

खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरें यांचे स्वप्न पूर्ण करीत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारले. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द झाले. आता सीएए कायदा लागू झाला. त्यामुळेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे आणि म्हणून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून यायला हवे. 

नाशिक ही प्रभू श्रीरामांची भूमी आहे. श्रीरामांचे धनुष्यबाण हे प्रतीक आहे, त्यामुळे नाशिकमध्ये धनुष्यबाणच पाहिजे आणि तो नाशिकमध्येच राहील, असे सांगत नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे हेच असतील, हॅट्रिक करण्यासाठी कार्यकत्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. 

भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे आदि उपस्थित होते.