बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ईसापुर धरण बांधण्यात आल्यापासून नदीचा मुख्य स्त्रोत पूर्णतः रोखण्यात आला आहे त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले जात नसल्याने पैनगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर जलसंकट कोसळले आहे तसेच शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देणे कठीण झाल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष श्री चक्रधर पाटील देवसरकर व इतर मान्यवर यांचे वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन दिले आहे परिसरातील पैनगंगा नदी काठावरील शेतकरी व प्राण्यांवर गंभीर जलसंकट दरवर्षी येत असते याची शासनाने गंभीरपणे दखल न घेतल्यास संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे
राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने यापूर्वी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन दिले असतानाही अद्याप पावेतो पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलेले नाही उर्ध्व पैनगंगा प्रकल्प सिंचन विभाग उमरखेड येथे आवश्यक तेवढे कर्मचारी उपलब्ध नाही त्यामुळे कर्मचारी भरणा करणे गरजेचे आहे पैनगंगा नदी पात्रात सिंचनासाठी दरवर्षी किमान दोन वेळा पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी सिंचन विभाग नांदेड यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कोट्यातील पिण्याचे पाण्याची 27 कोटी थकीत व चालू पाणी पट्टी बाबत प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढून वेळेवर पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे सिंचन विभागाने नदी नाले व कालवे याची अवास्तव वाढीव केलेली पाणी पट्टीचे दर कमी करावे ईसापुर डावा कालवा एक ते पन्नास किमी बांधकाम दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे तसेच उमरखेड तालुक्यातील 42 गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोन महिन्यापासून नदीपात्रात पाणी आटल्याने गंभीर निर्माण झाला आहे त्यामुळे गुराढोरांचा व शेतकऱ्यांच्या पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी तात्काळ पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे असे लेखी निवेदन देण्यात आले आहे अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.





Social Plugin