Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र माहूर मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न


सोनु  राठोड ग्रामीण प्रतिनिधि

स्थानिक कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात दि.२० मार्च रोजी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.निरंजन केशवे यांचे अध्यक्षतेत भारतीय काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्याने तालुका कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.

उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ.निरंजन केशवे यांचे नेतृत्वात निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, विश्वनाथ कदम, मंचकराव देशमुख,अनिल पाटील हडसनीकर,जयकुमार अडकीने, अनिल माडपेलीवार, निसार कुरेशी, बाळासाहेब  शिऊरकर, राजू सौंदलकर,विक्रम राठोड, प्रमोद राठोड,संजय आराध्ये, अनिल झोळ, सयद अली,अमोल केशवे,अहेमद कुरेशी,तुकाराम वाघमारे, सिद्धार्थ तामगाडगे,करीम शहा,अजीम सय्यद, सोनु राठोड,शेख आयुबभाई, लुकमानभाई, गफार भाई,जब्बार भाई, द.म. देशमुख,सचिन बेहेरे, जयकांत मोरे,अरविंद शिंदे आनंदराव कलाने,अमजद हैदरखान पठान, प्रकाश खडसे, राजू शिंदे, फय्याज फारुकी, भागवत जायभाये, देवानंद जाधव, गजानन पुलाते,  ईश्वर काळे, सुनील चुंगडे, सखाराम रनखांब आदींची उपस्थिती होती.