Ticker

6/recent/ticker-posts

शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक : शहरात रंगाची उधळण करत मोठ्या आनंदात व जल्लोषात  रंगपंचमी साजरी करण्यात आली.  डिजेच्या तालावर, पाण्याच्या शॉवरखाली, रंगाची उधळण करत मोठ्या जल्लोषात नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली. नाशिक शहरातील रंगपंचमीचे राज्यात आकर्षण आहे.  बच्चे कंपनी, मित्र मैत्रिणी जेष्ठ नागरिक, आशा सर्वांकडून रंगपंचमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. जुन्या नाशकात असणाऱ्या रहाडीत, रंग खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

रहाडीत खेळण्यासाठी तयार करण्यात येणारा रंग हा पूर्ण नैसर्गिक असल्याने मनसोक्तपणे या रहाडीत रंग खेळण्याचा आनंद नाशिककरांकडून घेण्यात आला. शहरातील प्रत्येक रहाडीत तयार करण्यात आलेला रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार करण्यात आला होता. आपली परंपरा जपत, रहाडीत रंगपंचमी खेळण्यात आली. शहरातील प्रत्येक उपनगरातील विविध सोसायटी, अपार्टमेंट यांनी रंगपंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात रंगाची उधळण करण्यात आली. केमीकल रंगाचा होणारा विपरित परिणाम पाहता नाशिककरांनी यंदा नैसर्गिक रंगाना अधिक पसंती दिली.