Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक लोकसभा जागेचा तिढा अजून कायम, दिल्लीतून निर्णय होणार?


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक -  नाशिक लोकसभेची कुणाला सुटणार याचा तिढा अजूनही कायम आहे. छगन भुजबळ यांची  इच्छा असल्याचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे गोडसे या जागेसाठी आग्रही आहे.  रविवारी भाजपाच्या बैठकीसाठी आलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या जागेसाठी प्रत्येकजण आग्रही आहेत. परंतु निर्णय हा दिल्लीहोणार आहे, असे सांगितले.

नाशिकमध्ये आलेल्या गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना नाशिकच्या जागेवरुन भाष्य केले. नाशिकची जागा सद्या शिंदे गटाकडे आहे. विद्यमान खासदार असल्याने त्यांचा दावा रास्त आहे. परंतु भाजपाचीही ताकद दुर्लक्षुन चालणार नाही. नाशिकमध्ये भाजपाचे तीन आमदार आहेत. महापालिकेत सत्ता होती, संघटनात्मक बांधणीही आहे. त्यामुळे आम्हालाही वाटते ही जागा भाजपाला मिळावी. 

परंतु महायुती असल्यामुळे जागा वाटपाचा निर्णय घेताना कोणत्या जागा शिल्लक आहेत. त्याप्रमाणे मित्र पक्षांनाही त्या द्याव्या लागतात. अजित पवार गटही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. आता याबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतृत्वच घेऊ शकेल असे सांगितले