Ticker

6/recent/ticker-posts

सप्तशृंगगडावर आजपासून ई बस धावणार.


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक :  सप्तशृंगगडावर दि. १ एप्रिल (आजपासून) ई बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे, आता सप्तशृंगगडावर  जाण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे असे M.S.R.T.C कडून समजते.  

साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिक ते सप्तशृंगगड अशी बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आज या बससेवेला प्रारंभ होणार असून, सकाळी पाच ते सायंकाळी साडेसहापर्यंत या बसफेऱ्या होणार आहेत. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.