Ticker

6/recent/ticker-posts

बळीराजा प्रकल्प ग्रस्त समितीची बैठक संपन्न


आज दिनांक १० मार्च ला विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कॄती संघर्ष समिती जिल्हा वाशिम ची सभा बाबुसींगजी पवार काका यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर , समिती पदाधिकारी शिवदास म.ताठे, राधेश्याम शिरसाट,संजय भरदुक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकसंघ राहण्यासाठी सभेमध्ये चर्चा करण्यात आली.

यावेळी मनोहरराव मते,माधव कांबळे,परशरामजी झळके सर,मा.सरपंच भावरावजी मापारी, गिरधारी राठोड, शोभाताई काळेकर,शेख हुसेनभाई मंत्री,मदन हमाने सर, शिवदास म.ताठे, बाबुसींगजी पवार काका इ.नी वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.शेवटी जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकसंघ राहण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. .

 या सभेस संतोषराव भिसडे, रवि पाटील रंजवे, वामनराव मारूटकर, पंडितराव मुसळे, गणेश यशवंत, पंढरी पाटील, संदीप धुळधुळे,बाळुराव जाधव,परशराम आडे,दलपत चव्हाण, नामदेव पाबळे,भागवत भोडणे, भिकाजी सदार, हरिश्चंद्र गोंदमले,विनोद तिडके, माणिकराव सुरडकर,राजु तिवारी,नुरबेग बोरगाव,सहदेव हिसेकर, महेन्द्र गोरे,दशरथ पवार,गुलाब राठोड, पांडुरंग देवळे, नारायण कुरवाडे, रामभाऊ नेहुल, संजय पवार,जगदेव भुजाडे, यासह वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.