Ticker

6/recent/ticker-posts

गुरूपिंप्री येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता


हर्षदा कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी गुरूपिंप्री 

गुरूपिंप्री : गुरूपिंप्री येथे दि. 03 मार्च ते दि. 10 मार्च 2024 या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे आयोजन प. पु. गुरूवर्य जोग महाराज, प. पू. गुरूवर्य शंकरगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ब्रम्हलीन प.पु. 1008 कार्तिक स्वामी सदगुरू भारती महाराज ( श्रीक्षेञ वनारशी), ह.भ.प . कृष्णदेव महाराज काळे देवगाव, ह. भ.प. गुरूवर्य वामन महाराज बाहेकर अंभोरा व गुरूवर्य ह.भ.प.पद्माबाई महाराज गुरूपिंप्रीकर यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न झाला. मागील नऊ वर्षा पासून हा सप्ताह नियमित होत आहे, तरी या वर्षी दहावे वर्षे होते.

 या वर्षी ही मोठ्या उत्साहात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी महाशिवराञीच्या निमित्ताने गेल्या  नऊ वर्षी पासुन केले जाते. या सात दिवसाच्या नियोजना मध्ये  दररोज सकाळी काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी संगित रामकथा, सायं काळी हरीपाठ व किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी रामकथेचे प्रवक्ते ह.भ.प. प्रभाकर महाराज सुरासे हे होते. चांगल्या पध्दतीने त्यानी रामकथा श्रवणाचा भाविकांनी लाभ घेतला. तसेच  दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या किर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. या सप्ताहात विविध विषयांवर किर्तन श्रवणाचा लाभ गावातील भाविकांना झाला. 

या सप्ताहात मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतला व या सप्ताहात पुर्ण करण्यासाठी मदत केली. या सप्ताहा मुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गावात सतत धार्मिक कार्यक्रमा मुळे शांतता, सलोखा निर्माण होतो व गावात आनंदाचे वातावरण या सप्ताहा मुळे निर्माण झाले होते. आजच्या  या सप्ताहाच्या शेवटचा दिवशी किर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गावातील व बाहेर गावातून  आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ झाला. गावातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.