Ticker

6/recent/ticker-posts

गुरूपिंप्री परिसरात बैल जोड्या चोरांचा सुळसुळाट


हर्षदा कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी गुरूपिंप्री 

गुरूपिंप्री : गुरूपिंप्री परीसरात मागील काही दिवसान पासुन बैल जोड्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांन पासुन या परिसरात मोठ्या प्रमाणात या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकान मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात गुरूपिंप्री येथे काही बैल जोड्या व गाय चोरोला गेले होते, त्याचा तपास लागला नाही, या परिसरात मोठ्या प्रमाणात काही वेगवेगळ्या गावातील बैल जोड्या चोरोला गेलेल्या घटना घडत आहेत. या चोरीच्या घटनांना आळा बसावा या साठी नागरीकांनी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन लवकरच तपास लावण्यात यावा अशी नागरीकांची विनंती आहे. 

या भागात मोठ्या प्रमाणावर अशा बैल चोरीच्या घटानांनमुळे नागरीक भयभीत झाले आहे. शेतकरी आपल्या बैल जोड्यांचे राञी राखण करत आहे. शेतात काम करणारी बैल जोड्यांचा सांभाळ शेतकरी जीवापाड करत असतो. आपल्या शेतात विविध प्रकारचे कामे करण्यात साठी बैलांचा वापर तो करत असतो. या चोरीच्या भितीने शेतकरी राञी  मोठ्या प्रमाणात आपल्या बैलांचे राखण करत आहे व काही शेतकरी हे आपल्या बैलांना शेतात न बांधता संध्याकाळी घरी घेऊन येत आहे. आपला बैलांना जीवापाड जपणारा शेतकरी हा या बैल जोड्या चोरांचा पासुन आपल्या बैल जोड्यांचे संरक्षण करत आहे. वेगवेगळ्या भागात तही या घटना घडताना दिसून येते  आहे, त्यामुळे नागरीकानी आपल्या बैल जोड्यांची काळजी घ्यावी असे सांगण्यात येते आहे.