Ticker

6/recent/ticker-posts

नाशिकचे रहिवासी वातावरणातील बदलामुळे हैराण



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिकचे रहिवासी वातावरणातील बदलामुळे हैराण झाले आहेत. नाशिककर त्रस्त हिवाळा संपल्यात जमा असला तरी पहाटे गारवा जाणवत असून दुपारी मात्र कडाक्याचे ऊन चटका देत आहे.

मार्च महिना सुरू असून  तापमान ३५ अंशांवर पोहोचत आहे. नाशिककरांना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी १० वाजेनंतर ऊन चांगलेच पडत आहे. त्याच्या झळा नाशिककरांना बसत आहेत. सकाळी थंड वातावरण आणि सकाळ झाल्यानंतर मात्र तापमानात वाढ होत जाऊन दुपारी तापमान ३५ अंशांवर पोहोचत आहे . बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिकचे तापमान काल सकाळी १९.९ अंश इतके तर दुपारी तापमान ३४ अंशावर जात असल्याचे दिसते.