कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक महापालिकेत अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेतील तब्बल साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे शहरातील विविध कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. आयुक्तांसह दोन्ही अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांच्यासह साडेतीन हजार अधिकारी व सेवकांना लोकसभा निवडणुकीचे काम असणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामातून महापालिकेतील पाणीपुरवठा, सफाई, अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत असल्याने वगळण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघात मनपा अधिकाऱ्यांना नेमणूक मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. यासाठी शासकीय व निमशासकीय विभागांकडून मनुष्यबळ घेण्यात येत आहे. वाहने देखील गोळा करण्यात येत आहे. मनपाकडे लोकसभा निवडणुकीकरिता महापालिकेतील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी असणार आहे.
.png)




Social Plugin