Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना नाशिक जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - लोकसभा अचारसंहिता लागण्यास काही दिवस बाकी असताना शिवसेना युवा नेते खा. श्रीकांत शिंदे आज दिनांक १२ रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे. नाशिक जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन मंगळवार (दि. १२) दुपारी ४ वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. 

युवानेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक जिल्हयातील पेठ तालुक्यातील काहांडोळपाडा येथून सकाळी १०.३० वाजता दौऱ्याला सुरूवात होणार असून, मोहपाडा ते देवळाचा पाडा रस्त्यावर दमणगंगा संवाद साधणार आहे. या मेळाव्यास शिवसेना जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना प्रवकत्या प्रा. ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे देखील मार्गदर्शन करतील. संवाद मेळाव्यासाठी नाशिक शिवसेनेच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून, शहर भगवेमय झाले आहे, तसेच सुरगाणा नगरपंचायत येथील आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभासह डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुरगाणा शहरासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दल गाडी, घनकचरा संकलन वाहनासह इतर वाहनांचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.