Ticker

6/recent/ticker-posts

के के वाघ तंत्रनिकेतन नाशिक मध्ये स्वर्गीय काकुशेठ उदेशी यांची जयंती साजरी


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - के के वाघ तंत्रनिकेतन नाशिक मध्ये स्वर्गीय काकुशेठ उदेशी यांची जयंती साजरी करण्यात आली मा. प्राचार्य कडवे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

स्वर्गीय काकुशेठ उदेशी यांच्या विषयी सांगताना मा. प्राचार्य कडवे सर म्हणाले की, परोपकारी उदेशी कुटुंबातील श्री रतनसे हरिदास उदेशी (काकुसेठ) यांनी के.के. वाघ एज्युकेशन सोसायटीला २३ एकर जमीन देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि सोसायटीच्या अमृतधाम येथील मुख्य परिसराला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ‘हिराबाई हरिदास विद्यानगरी’ असे नाव देण्यात आले. काकुसेठ यांनी धर्मादाय दवाखाने, संस्था, शाळा, रुग्णालये स्थापन केली आहेत.