प्रतिनिधि : कृष्णा महाले
उल्हासनगर मध्ये गेल्या दहा महिन्यापासून पूरग्रस्त नागरिक शासकीय योजनेपासून वंचित आहेत पंचनामे होऊन देखील तात्काळ मदत मिळत नसल्याने संतप्त महिलांनी उल्हासनगरच्या तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली आहे पूरग्रस्तांचा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी ह्या महिला तहसील कार्यालयात जमल्या होत्या. येत्या पंधरा दिवसांमध्ये पूरग्रस्त निधीपासून वंचित असलेल्या नागरिकांना मदत मिळणार असल्याचा आश्वासन तहसीलदार कल्याणी मोहिते यांनी दिली आहे. पूरग्रस्त नागरिकांना पंधरा दिवसांमध्ये मदत मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा बसपाच्या उल्हासनगर महिला शहरध्यक्षा निवेदिता जाधव यांनी दिला आहे.





Social Plugin