प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
:उल्हासनगर स्टेशन रोड संतू बिल्डिंग परिसर येथे साई पार्टी च्या कार्यालयात विभाग प्रमूख सुनिल सिंग (कलवा) यांच्या वतीने अर्ज भरण्याचे शिबिर घेण्यात आले यामध्ये दोनशे ते अडीचशे ज्येष्ठ नागरिकांनी आपला अर्ज भरला मुख्यमंत्री वायोश्री योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये महाराष्ट्र 2024 महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना”राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे
योजनेव्दारे ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व निराकरणासाठी आवश्यक उपकरणे
उपकरणे खरेदीसाठी ३ हजार रू. एकरकमी बँक खात्यात जमा होणार कागदपत्रे : आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र २ पासपोर्ट साईज फोटो, राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक झेरॉक्स कॉपी जमा करण्यात आले तसेच यावेळेस मा. उप महापौर जीवन इदनानी,समाजसेविका किरण सुनील सिंग, मा .महापौर आशा इदनानी, मा .नगरसेविका इंद्रा उदासी व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली





Social Plugin