Ticker

6/recent/ticker-posts

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बदली


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ज्या जिल्ह्याचा अधिकारी आहे त्यांची बदली करण्यात येते, तसेच ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाला असेल त्यांची देखील बदली करण्यात येते. नाशिक महापालिकेचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार व पर्यावरण उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने मंगळवारी बदलीचे आदेश काढले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर बदलीचे आदेश महापालिकेत धडकले. प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर व कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार स्व जिल्ह्यातील असल्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दोघा उपायुक्तांची बदली झाली आहे. तर पर्यावरणचे उपायुक्त विजयकुमार मुंढे यांना जिल्ह्यात तीन वर्षे कार्यकाळ झाल्याने त्यांची बदली करण्यात आली.