बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
उमरखेड नगरपालिका येथील अध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या उमरखेड नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. उमरखेड नगरपालिकेतर्फे उमरखेड शहरातील मालमत्तांवर आकारण्यात आलेल्या करवाढ मध्ये नगरपालिकेने भरमसाठ कर वाढ केलेली आहे. कोरोना महामारी मुळे लोक पहिलेच आर्थिक संकटात सापडले होते त्यातून कसेबसे सावरत पूर्व पदावर येत असून नागरिकांना घर खर्च चालवणे कठीण झाले होते त्यातच नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये तिपटीने कोणताही विचार न करता कर वाढ केलेली आहे
त्यामुळे उमरखेड शहरातील मालमत्ताधारक अतिशय आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे उमरखेड शहरातील मालमत्ता धारक नागरिकांनी सदर करण्यात आलेली करवाढ स्थगित करून पूर्वीप्रमाणेच कर आकारण्यात यावा या अनुषंगाने निवेदनाद्वारे आक्षेप दाखल केले आहेत. नगरपालिकेने आकारणी केलेली कर वाढ कमी न केल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी नागरिकांमध्ये चर्चा ऐकावयास मिळत आहे.





Social Plugin