बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
नांदेड येथील बहुप्रतिक्षित असलेली विमान सेवा अखेर 31 मार्च 2024 रोजी सुरू झाली आहे 31 मार्च 2024 पासून दररोज नांदेड ते बंगळूर, नांदेड दिल्ली जालंदर तर आठवड्यातून काही दिवस नांदेड हैदराबाद व नांदेड अहमदाबाद विमान सेवा सुरू होणार आहे. सन 2017 मध्ये पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी नांदेड विमानतळावरून उडे देश का हर आदमी योजनेनुसार विमानसेवेचा प्रारंभ केला होता परंतु विमानसेवा काही दिवस चालली आणि पुढे बंद झाले.
त्यानंतर नांदेड विमानतळावरील सेवा व दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि नाईट लँडिंग व्यवस्था करण्यात आली त्यानंतर काही कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्यात रस दाखविला. त्यात स्टार एअरने सर्वेक्षण केले सुरुवातीला नांदेड ते पुणे ही विमानसेवा सुरू होणार असल्याच्या चर्चा होत्या पण पुणे विमानतळावर जागा मिळत नसल्याने सदर सेवा सुरू झाली नाही आता दिनांक 31 मार्च पासून दररोज नांदेड ते बंगळूर, नांदेड दिल्ली जालंदर ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारासाठी संपूर्ण जगभरातून शीख बांधव नांदेड येथे येत असतात त्यांना आता या विमानसेवेचा लाभ घेता येईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली ही विमानसेवा किती दिवस सुरू राहील हे प्रवाशांच्या संख्येवरच अवलंबून राहील.





Social Plugin