कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत शहर बससेवा सुरू केलेली आहे. सिटीलिंक ठेकेदार वाहतूक कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने वाहकांना आंदोलन करावे लागत आहे.
ठेकेदाराकडून थकलेले वेतन, पीएफ, इएसआयसी रक्कम पगारातून कपात करून खात्यावर जमा न करणे या मुद्दयाहून गुरुवारी (ता. १४) सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारीही (ता. १५) सुरू होते. जवळपास १५३ वाहक संपात सहभागी झाले आहे. संपावर काही तोडगा निघालेला नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. या आंदोलनात जवळपास १५३ अधिक पेक्षा कर्मचारी सहभागी झाले आहे





Social Plugin