राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबोधन संस्था मॅनेज हैदराबाद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद वाशिम आणि कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी सखींचे नैसर्गिक शेती पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम ची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शास्त्रज्ञ शुभांगी वाटाणे मॅडम यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी महिलांना पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या प्रशिक्षणासंदर्भात रिविजन घेऊन प्रत्येक लाभार्थी कृषी सखी यांना आपले अनुभव कथन करण्यास सांगितले प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र करडा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा नैसर्गिक शेतीचे तज्ञ डॉ. रवींद्र काळे सरांनी उपस्थित ग्राम कृषी सखी यांना मोलाचे मार्गदर्शन केले व ग्राम सखी यांनी पाच दिवशी प्रशिक्षण घेऊन ग्राम पातळीवरती नैसर्गिक शेतीमध्ये नवीन कृषी क्रांती घडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद वाशिमचे जिल्हा व्यवस्थापक सुजे साहेब त्यांनी उपस्थित सखी यांना उमेद अभियान व ग्रामविकास तसेच राज्य शासन व केंद्र शासनाच्या ग्रामविकासाकरिता योजना कृषी विस्तारात माहिती देऊन प्रशिक्षित ग्राम सखी यांचे अभिनंदन केले तसेच मास्टर फार्मर रवींद्र गायकवाड यांनी पाच दिवस घेतलेले
ग्राम कृषी सखी यांनी प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग आपल्या गावी नैसर्गिक शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करावा तसेच पाच दिवसांमध्ये आपण शिकलेले ओन फॉर्म प्रोडक्शन ऑफ बायो इनपुट हे आपण आपल्या शेत बांधावरती तयार करून शेतकऱ्यांना त्याची प्रात्यक्षिक दाखवावे व आपल्या शेतामध्ये वापरण्यास सांगावे तसेच उत्पादनावरील होणारा निविष्ठेचा खर्च वजा करून आपल्या उत्पादनामध्ये भर पाळण्यास शेतकऱ्यांना मदत करावी म्हणजेच त्यांना नैसर्गिक शेतीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यावे व आपल्या गाव पातळीवरती नैसर्गिक शेतीमधील बचत गट तयार करून ग्रुपने शेती करावी असे आवाहन केले
निरोगी जीवन जगण्यासाठी नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही भाजीपाला अन्न फळे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे नॉलेज ग्राम पातळीवरती कृषी सखी उत्कृष्ट प्रकारे देऊ शकते व जास्त जास्त तृणधान्य कडधान्य व श्री धान्य उत्पादनावरती कृषी सखी यांनी भर द्यावा व आपल्या विकास करून आपल्या गावाचा सुद्धा विकास करावा गावाचा विकास झाल्यास राष्ट्राचा विकास नक्कीच होतो यामध्ये शंका नाही असे मार्गदर्शन मास्टर फॉर्मर रवींद्र गायकवाड यांनी केले. प्रशिक्षण सहाय्यक अक्षय कुमार गिरी त्यांनी सुद्धा उपस्थित प्रशिक्षार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पाच दिवसीय नैसर्गिक शेती कृषी सखीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाळण्याकरिता शास्त्रज्ञ शुभांगी वाटाणे मॅडम यांनी अतोनात परिश्रम घेतले. गुरुदेव सेवाश्रम समितीचे व्यवस्थापक प्रशांत भाऊ देशमुख यांनी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केल्यामुळे त्यांची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली. असे असल्याचे कृषी विज्ञान प्रतिनिधी यांनी कळविले





Social Plugin