मा नगरसेविका ज्योती दिलीप गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉ. भोसले यांचा व्यकटेश हॉस्पिटल ते प्रगती क्लासेस ते बिर्ला मंदिर या रस्त्याचे सिमेंट काँक्रीकरण चे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले होते. या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ववत सुरु करावे यासाठी या प्रभागच्या मा नगरसेविका ज्योतीताई दिलीप गायकवाड यांच्या नगरसेवक निधीतून आणि शिवसेना उपजिल्हा शहर प्रमुख दिलीप गायकवाड यांच्या पाठपुराव्याणे अपूर्ण अश्लेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचं कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन केल्याबद्दल प्रभाग 1 मधील सर्व राहिवासी हे नवसेविका ज्योती गायकवाड व शिवसेना शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांचे मनापासून आभार मानत आहेत.
गायकवाड हे फक्त राजकारणी नसून हाडाचे समाज सेवक आहेत असं परिसरातील जनता त्यांच्या विषयी गुणगान गात असतात. या रस्त्याचा वापर प्रभाग क्रमांक 1 मधील शनी मंदिर, तानाजी नगर, हनुमान नगर, शिवनेरी नगर, इंदिरानगर, कमला नेहरू नगर, गणगौर चौक या सर्व परिसरातील रहिवाशी करत होतो.मा नगरसेविका अर्चना करंकाळे , युवा शिवसेना प्रमुख प्रविण गायकवाड - उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड यांच्या हस्ते कामाचे शुभारंभ करण्यात आले ....
या प्रसंगी ,विभाग संघटक आनंद सावंत,उपशहर प्रमुख बाळा श्रीखंडे,उप विभाग प्रमुख विल्सन डिसोजा , शाखा प्रमुख पप्पु वाघ, युवा संघटक निलेश माने, उप विभाग संघटक कल्पेश वाघ, जेष्ठ शिवसेनिक रामचंद्र रेणुशे,शिवसेनेचे कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिक आणि महिलाही मोठया संख्येने उपस्थित होते...





Social Plugin