Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचा अर्ज नामंजूर.


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

    उमरखेड येथील व्यावसायिक सतीश भागवते यांनी विद्यमान दिवाणी न्यायालय उमरखेड येथे दि. मु. नं. 84/22 हा व प्रवीण निलावार यांनी दि.मु. नं. 88/22 हा मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांचे विरुद्ध दाखल केले. सदर दाव्यात श्री देविदास शहाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती उमरखेड यांना पक्ष जोडण्यासाठी अर्ज दाखल केले  

       सदर दोन्ही अर्जावर वादी यांची बाजू अड.संजीव कुमार जाधव यांचे जूनियर अड. महेश वानखेडे यांनी मांडली. मा.दिवाणी न्यायाधीश क. स्तर उमरखेड यांनी दि. 14/03/2024 रोजी आदेश पारित करून पुतळा समितीचे अर्ज नामंजूर केले. अड. महेश वानखेडे यांनी चांगल्या प्रकारे न्यायालयासमोर बाजू मांडल्याबद्दल त्यांचे वकील मंडळीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.