प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर ५ येथे अंबरनाथ विधानसभेचे आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातिल विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी याचे भूमिपूजन करण्यात आले.
अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातिल विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत ५० मुले व ५० मुलींची शिक्षण व वस्तीगृहाची व्यवस्था होणार आहे.त्यामुळे येथील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या प्रशिक्षणा साठी योग्य ते प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहे. तसेच आज अन्य कामांचे भूमिपूजन ही करण्यात आले त्यात सामजिक सभागृह टाऊन हॉल ,भाजी मार्केट साठी दोन मजली इमारत व सुभाष टेकडी पंचशील नगर येथे रोडाचे भूमिपूजन करण्यात आले .
यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख रमेश चव्हाण, उप जिल्हाप्रमुख अरुण अशान, राष्ट्रवादीचे पार्टीचे प्रदेश चिटणीस भारत गंगोत्री, शहर संघटक नाना बागुल, मा.नगरसेवक प्रमोद टाले, उपशहर प्रमुख संदीप डोंगरे उपशहर प्रमुख परशुराम पाटील, रवी पाटील, महीला संघटक मनीष भानुशाली,भगवान भालेराव, भाजप शहरअध्यक्ष प्रदीप रामचंदानी पदाधिकारी,कार्यकर्ते युवसेनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते





Social Plugin