प्रतिनिधी
झोटींगा (ता.सिंदखेडराजा) येथे शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वात गावोगावी निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे दिनांक 13 मार्च रोजी झोटिंग येथे निर्धार परिवर्तन यात्रा मेळावा पार पडला
रविकांतभाऊ तुपकरांच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याला परिसरातील गावकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मेळाव्याला मोठी गर्दी केली होती. डिजे लावून जेसीबीने पुष्पवृष्टी करत गावकऱ्यांनी संपूर्ण गावातून रविकांतभाऊ तुपकरांची जंगी मिरवणूक काढली. त्यांचे प्रेम आणि ओसंडून वाहणारा उत्साह पाहून भारावून गेल्याची भावना रविकांतभाऊंनी व्यक्त केली.
त्याचबरोबर, अंढेरा येथील निर्धार मेळाव्यालाही गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे पाहून एका गोष्टीचे समाधान वाटते की, ही लोकसभेची निवडणूक माझी एकट्याची नसून ती खऱ्या अर्थाने लोकांची निवडणूक बनली आहे. आता गावोगावी वातावरण पेटले असून नागरिकांनीच आता ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. अशा भावना रविकांतभाऊ तुपकरांनी यावेळी व्यक्त केल्या.





Social Plugin