Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ स्तरीय सभा अमरावती येथे संपन्न

    


     विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृति संघर्ष समिती, ची सभा समितीचे जेष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी विधळे सर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. शासनाने सरळ खरेदी केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात गेल्या १०वर्षां पासून सतत अनेक आंदोलन करीत आहे, शासना सोबत अनेक बैठका झाल्यात परंतु निर्णय मात्र अद्याप पर्यंत झालेला नाही, मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे वारंवार आश्वासन दिले,त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री वाशिम येथे आले असता पुन्हा त्यांना निवेदन देऊन बैठक घेऊन निर्णय घेण्या संदर्भात चर्चा करण्यात आली,पुन्हा त्यांनी बैठक घेऊ असे सांगितले,तसेच उपमुख्यमंत्री श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांची देखील नागपूर हिवाळी अधिवेशन काळातील आंदोलनानंतर दोन वेळा समिती पदाधिकारी यांच्या सोबत भेट झाली त्यांनी देखील मला प्रकल्पग्रस्तांचा विषय माहिती असून आपण लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ,परंतु अद्याप पर्यंत बैठक होऊन निर्णय झाला नाही,कदाचित शासन आपल्याला जाणूनबुजून फिरवतअसून त्यांच्या मनात काही औरच आहे,

    परंतु येणारी लोकसभा निवडणूक समोर ठेऊन आपल्याला लवकरच काही ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्या कारणाने आजची बैठक अमरावती येथे श्री.विधळे काकांच्या घरी बोलावली होती,सदर बैठकी मध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, सरकार प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर येत्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार नसेल तर मग नाईलाजाने प्रकल्पग्रस्तांना देखील सरकार विरोधात निर्णय घेऊन काम करावे लागेल,प्रकल्पग्रस्तांची संख्या प्रत्येक मतदारसंघात निर्णायक असल्याने सत्ताधारी पक्षाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील.तसेच प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी इ मेल आंदोलना मध्ये सक्रीय सहभाग घेऊन आपल्या फोन मधून मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व समस्या ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवायचे आहेत.तसेच ज्यांना ईमेल करणे जमत नसेल त्यांना गावातील प्रकल्पग्रस्तांनी मदत करायची आहे,तसेच प्रकल्पग्रस्तांनी आपापल्या गावात संघटनेने सांगितल्याप्रमाणे बॅनर लावायचे आहेत बॅनरची डिझाईन आपल्याला पाठविली जाईल,सर्वच स्तरातून सरकारला प्रकलापग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता बाध्या करायचे असे ठरविण्यात आले.

          यावेळी सभेच्या अध्यक्ष श्री. बाबुसिंग पवार काका,प्रकल्पग्रस्त संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. साहेबरावजी विधाळे काका,विदर्भ अध्यक्ष श्री.मनोजभाऊ तायडे, विदर्भ कार्याध्यक्ष श्री. माणिकराव गंगावणे सर, वरिष्ठ मार्गदर्शक श्री. उमाकांतजी अहिरराव,उपाध्यक्ष श्री. विकासभाऊ राणे,विदर्भाचे सचिव श्री.विजयभाऊ दुर्गे, तसेच सदस्य श्री.ओमप्रकाश कुटेमाटे सर ,श्री.शिवदासजी ताठे,श्री.निलेश बनारसे,श्री.रवींद्र श्रूंगारे,श्री.नरेंद्र पांडव, श्री.पुंडलिकराव घुगे,श्री.संतोषराव भिसडे,श्री. रवी पाटील रंजवे,श्री.अशोक मगर,श्री. राधेश्याम शिरसाट, श्री.राजकुमार कडू,श्री.अतुल महल्ले,श्री. अंकित तायडे,श्री.भारत वरधे,श्री.संजय इंगोले श्री.संजय भरदुक,श्री. सुनील राठोड,श्री.दिनकर बगे,श्री. सुखदेवराव घुगे,श्री. गंगाधरराव बोदुळे,श्री.बाबुराव वानखडे,श्री. रंजन बांबळकर, श्री.वाघाडे, इ.विदर्भातुन समिती चे पदाधिकारी सभेस प्रामुख्याने उपस्थित होते.