राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबोधन संस्था हैदराबाद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद आणि कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने कारंजा लाड येथील गुरुदेव सेवाश्रम समिती शांतीनगर कारंजा लाड येथे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 11 ते 15 मार्च दरम्यान संपन्न होत आहे
आज दिनांक 12 मार्च रोजी कृषी सखी यांना मास्टर फॉर्मर रवींद्र गायकवाड यांनी नॅचरल फार्मिंग शेती पद्धतीचे प्रशिक्षण या मध्ये नैसर्गिक शेती, आदर्श जमीन, पिकाचा आदर्श फेरपालट, एकमेकांच्या सानिध्यात वाढणाऱ्या विविध मिश्र पीक पद्धती ,बायोडायनॅमिक शेती, हिरवळीचे खते तयार करणे, बायोडायनामिक कंपोस्ट ,द्रव्य खत व कीटकनाशके, बायोडायनिक वृक्षलेप, जिवाणू खताचे प्रकार व उपयोग, एकात्मिक व नैसर्गिक पीक रक्षण, गांडूळ खत तयार करणे, वर्मी वॉश तयार करणे ,नैसर्गिक मित्राचा शेत बांधावरती शोध, वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करणे, फळबागेची काळजी, शेतीला लागणारे बायो इनपुट ,सूक्ष्म अन्नद्रव्य ,सेंद्रिय पदार्थ, विविध रोगांवरती नैसर्गिक उपाय योजना ,नैसर्गिक बुरशीनाशके किडी व रस शोषण करणाऱ्या किडींकरिता उपाय योजना, आदी विषयाचे प्रशिक्षण देऊन उद्या दिनांक 13 मार्च रोजी ग्राम गायवळ येथील डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र येथे प्रात्यक्षिकाची प्रशिक्षण देण्यात येणार आहे
सदर प्रशिक्षण कार्यक्रम पार पाळण्याकरिता शास्त्रज्ञ गृहशास्त्र विभाग प्राध्यापक शुभांगी वाटाणे मॅडम व फळबाग तज्ञ पाटील सर, पीक तज्ञ तुषार देशमुख सर, कीटक शास्त्रज्ञ डवरे सर व त्यांची सहकार्य टीम वरील सर्व मंडळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शना मध्ये पाच दिवसाची प्रशिक्षण कृषी सखींना देण्याचे युद्ध पातळीवरती काम सुरू आहे ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या कृषी सखी येणारे पिढी करिता नैसर्गिक शेतीचे उत्कृष्ट मॉडल तयार करणार आहेत सदर मॉडेल मधून भावी पिढीला विषमुक्त व रसायनमुक्त अन्न मिळणार आहे करिता ग्राम पातळीवरती प्रशिक्षण पूर्ण करून शेतकऱ्यांना सहाय्य करण्याकरिता कृषी सखी काम करणार आहेत सदर प्रशिक्षण कार्यक्रम तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून कृषी सखी यांना नैसर्गिक शेतीमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कृषी संजीवनी म्हणून काम करीत आहे. असे असल्याचे कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी यांनी कळविले.





Social Plugin