Ticker

6/recent/ticker-posts

४ टक्के कमिशनची प्रभारी नायब तहसीलदार गणेश नागरे यांच्याकडून मागणी


पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला -ज्ञानेश्वर खरात पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती ! नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन !

गंगाराम उबाळे मलकापूर पांग्रा प्रतिनिधी 

कृषी योध्दा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी दि १८ मार्च रोजी सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तहसीलदार गणेश नागरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी केलेली खोटी तक्रार याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी म्हटले आहे की आपण कृषी योध्दा फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संघटनेचा अध्यक्ष म्हणून २०२० पासून शेतकऱ्यांसाठी काम करत आहे त्यांचे दोन लाखाच्या आसपास युट्युब फॉलोवर्स आहेत ते महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात,स्वतःच्या गावातील मातोश्री पांदण रस्त्याची फाईल तहसील कार्यालय येथे थांबली होती व ती का थांबली म्हणून ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी प्रभारी नायब तहसीलदार गणेश नागरे यांना विचारणा केली तेव्हा गणेश नागरे यांनी खरात यांना चार टक्के कमिशन ची मागणी केली तसेच खरात यांनी कमिशन देण्यास नकार दिला 

तेव्हा प्रभारी नायब तहसीलदार नागरे हे खरात त्यांच्यावर चिडले मी तुमचं कुठलाही प्रकारचं काम करणार नाही ऑफिसच्या बाहेर निघा अशी सुद्धा नागरे यांनी खरात यांना सांगितले,त्यानंतर खरात यांनी आमदार डॉ शिंगणे यांना फोन केला आणि अधिकारी लाच मागतोय आणि मुजोरपणे वागतो याची कल्पना दिली तेव्हा पुन्हा नायब तहसीलदार गणेश नागरे हे खरात यांच्यावर चिडले त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता तेव्हा नागरे हे खरात यांना म्हणाले की तुम्ही कोणत्याही आमदार खासदार तहसीलदार कोणाकडेही जा मी तुमचे कुठलेही प्रकारचे काम यापुढे होऊ देणार नाही 

तसेच खरात यांनी मोबाईल चालू करून रेकॉर्डिंग काढली तेव्हा नागरे हे त्यांच्या अंगावर धावून चालून आले खरात यांचा मोबाईल हिसकावून त्यांनी फरशीवर जोराने आपटला त्यानंतर खरं त्यांनी परत फोन उचलून रेकॉर्डिंग सुरू केली असता नागरे हे खरात यांना म्हणाले की तुला झोडपे ठेवून देईन रेकॉर्डिंग बंद कर त्यांनी परत खरात यांच्यावर चाल करून मोबाईल विसरून घेतला आणि फरशीवर आपटला,त्यानंतर नागरे हे परत खरात यांना म्हणाले की तुझ्यासारखे लोक मी 56 पाहिले तुझ्यावर फाईल फाडली म्हणून 353 सारखा गुन्हा दाखल करतो,सदर हा सर्व प्रकार तहसीलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे तसेच ज्ञानेश्वर खरात पाटील यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात रेकॉर्डिंग झाला आहे,त्यामुळे मजूर अधिकारी जर ३५३ सारख्या कलमांचा वापर शस्त्र म्हणून वापरत असतील तर सामाजिक प्रश्नासाठी कुठलाही प्रकारचा सामाजिक कार्यकर्ता पुढे येणार नाही असे सुद्धा यावेळी खरात यांनी सांगितले,त्यामुळे प्रभारी नायब तहसीलदार गणेश नागरे यांची खातीनिहाय  चौकशी करण्यात यावी 

तसेच तहसीलमधील सीसीटीव्ही बंद आहेत व ते का बंद आहेत याची सुद्धा लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी तसेच तहसीलमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा पत्रकार परिषदेनंतर उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्वर खरात यांनी केली आहे,