Ticker

6/recent/ticker-posts

मंठा येथे संत तुकाराम मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी मंठा 

मंठा : सालबादा प्रमाणे याही वर्षी श्री संत जगतगुरू तुकाराम महाराज बीजेनिमित्ताने  रंगनाथ गुरूजी रामगुरू बाबा, विश्राम गुरूजी  यांच्या आशीर्वादाने श्री ह.भ.प. गुरूवर्य लक्ष्मण महाराज बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य मंठा येथे संत तुकाराम मंदिरात दि.20 ते 27 मार्च दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद्भगवत  कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले आहे.  हा सप्ताह ह.भ.प श्री. लक्ष्मण महाराज बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे. संत जगतगुरू तुकाराम महाराज बीजनिमित्ताने गेल्या 26 वर्षी पासुन हा सप्ताह चालु आहे. या वर्षी या सप्ताहाचे 27 वर्षे आहे. या सात दिवसाच्या नियोजना मध्ये  दररोज सकाळी काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी संगितमय भागवत कथा, सायं काळी हरीपाठ व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या वर्षी संगीतमय श्रीमद्भगवत  कथेचे प्रवक्ते ह.भ.प. भागवताचार्य  श्रीहरी महाराज बाहेकर हे आहेत.अत्यंत चांगल्या पध्दतीने ते भागवत कथेचे निरोपन करत आहेत. या कथेचा श्रवणाचा भाविक लाभ घेत आहेत. 

तसेच  दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या किर्तनाचा लाभ भाविक घेत आहेत. या सप्ताहात विविध अभंगावर  किर्तन श्रवणाचा लाभ विविध गावातील भाविक घेत आहेत दररोज होत असलेली किर्तने अनुक्रमे ह.भ.प. नरहरी महाराज पळसेकर, ह.भ.प.108 महंत स्वामी मौनीबाबा ब्रम्हशक्तीपीठ, ह.भ.प. वेदांताचार्य अंकुश महाराज झोल, ह.भ.प. बापुसाहेब महाराज खवने, ह.भ.प.विश्वनाथ महाराज उगले,ह.भ.प. भागवताचार्ये दशरथ महाराज अंभोरे,  ह.भ.प. गणेश महाराज कोल्हे आणि शेवटच्या दिवशी ह.भ.प. लक्ष्मण महाराज बाहेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे. 

सप्ताह मध्ये जगतगुरू संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात भाविक श्रवणाचा लाभ घेत आहेत. मोठ्या प्रमाणात    तरूणांनी सहभाग घेतला आहे व या सप्ताहात पुर्ण करण्यासाठी मदत करत आहे. या सप्ताहा मुळे संत तुकाराम नगर येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत धार्मिक कार्यक्रमा मुळे शांतता, सलोखा निर्माण होतो व गावात आनंदाचे वातावरण या सप्ताहा मुळे निर्माण झाले. भाविकांनी या सप्ताहात किर्तनाचा श्रवणाचा लाभ घ्यावा असे ह.भ.प. तुकाराम महाराज यांनी केले आहे.