शिरपूर /सचिन पाटील
दि.8-3-2024 शिरपूर तालुक्यातील चोपडा शिरपूर रस्त्यावर असलेल्या नागेश्वर बंगला या ठिकाणी, आज शिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी जमली. अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले ते अतिशय पुरातत्त्व मंदिर असून श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी महिनाभर यात्रा उत्सव असतो. तसेच शिवरात्रीला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी उपस्थित होत असतात.
श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान तर्फे या ठिकाणी 1008 शिव पार्थिव शिवलिंगाचे पूजन करण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सातपुडा च्या पायथ्याशी असलेले क्षेत्र नागेश्वर यांचे अवलौकिक असे महत्त्व आहे.





Social Plugin