Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा सदस्य पदी अजय पाटील यांची नियुक्ती

 


प्रतिनिधी-शिवाजी डोंगरे, टाकरखेडा

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशाने माननीय अजय जयराम पाटील यांची जामनेर भारतीय जनता पार्टी सदस्य पदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया सौ. साधनाताई महाजन तसेच तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत बावीस्कर याच्या अध्यते खाली पार पडली. तसेच अजय पाटील यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शिक्षणसंस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर,जिल्हा सरचिटणीस आतिश झाल्टे,जिल्हायुवक अध्यक्ष  निलेश चव्हाण,शहर अध्यक्ष रवींद्र भाऊ झाल्टे,दीपक दादा तायडे,श्रीराम महाजन,सुभाष भाऊ पवार आदी उपस्थित होते.सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व जनेतच्या लहान मोठ्या अडी अडचणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करेल पक्ष संघटन साठी सदैव तत्पर राहील असे माननीय अजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले