Ticker

6/recent/ticker-posts

लोणार नगर परिषदेच्या सावळ्या गोंधळाविरोधात कुलूप लावा आंदोलन छेडू -डॉ. गोपाल बशिरे


लोणार:अनिल वायाळ प्रतिनिधी                            

  लोणार नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याकडून करण्यात येणाऱ्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात माहिती न दिल्यास नगरपालिकेस कुलूप ठोकून आंदोलन करू असा इशारा डॉ. गोपाल बशिरे यांनी मुख्याधिकाऱ्यास दिला.

      नगरपरिषदेने सदोष मालमत्तेचा सर्वे करून अव्वाच्या सव्वा कर आकारण्यात आलेला आहे सदरील सर्वे प्रत्यक्ष करून व त्या मालमत्तेच्या मोजमापाप्रमाणेच कर आकारण्यात यावा व त्यावरील व्याज वगळण्यात यावे व गत पाच वर्षात नगरपरिषदेने अग्निशमन गाडी व त्यावर झालेला खर्च, पाणीपुरवठा योजनेवर झालेला खर्च, बांधकाम विभागावर झालेला संपूर्ण खर्च, नगर परिषदेने घेतलेल्या नवीन वस्तू व जुन्या वस्तूंची लावलेली विल्हेवाट याची माहिती, गत पाच वर्षात किती कर्मचाऱ्यांची भरती केली व कोणत्या पद्धतीने केली व त्यापैकी किती सध्या कामावर आहेत, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा विभागात डेपुटेशन करून गावात घनकचर्याचे व्यवस्थापन वाऱ्यावर का सोडण्यात आले, कंत्राटी कर्मचारी यांच्या जागी आपण कायम कर्मचारी यांना काम करण्याचे आदेश देऊन कंत्राटी कर्मचारी यांचे बिल सुद्धा काढता कोणत्या आधारे काढत आहात अशा अनेक मुद्द्यांची सरबत्ती नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यावर करून येत्या सात दिवसात पुराव्यानिशी याचा खुलासा करण्यात यावा अन्यथा नगरपरिषदेला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशाराच डॉ. गोपाल बशिरे यांनी लोणारच्या नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिला याप्रसंगी नगरसेवक गजानन जाधव, सुधन अंभोरे, राजूभाऊ बुधवत ,श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, जीवन घायाळ, तानाजी मापारी, अश्रूबा धारकर, लूकमान कुरेशी, सय्यद उमर, इकबाल कुरेशी हे उपस्थित होते