राजू गागरे प्रतिनिधी
दिनांक 19/3/2024 रोजी मंगळवार 4 वाजताच्या सुमारास शिवणी( जहाँ) येथे डिपी ला मोठ्या प्रमाणात आग लागली त्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी तालुका प्रमुख नितीन गोरे हजर होते आगीचा भडका उडालेला पाहून नीतीन गोरे यांनी अथक परिश्रम घेऊन डिपीला लागलेली आग आटोक्यात आणली त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही आग महावितरण च्या चालढकल भोंगळ कामामुळे आगिचा भडका उडाला आणि यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱी कर्मचारी यांनी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास नितीन गोरे द्वारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्टाईलने भोंगळ कार्याबद्दल विरोध प्रदर्शन केले जाणार आहे.





Social Plugin