Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर मंगलधाम येथे खासदार निधीतून डोमशेड उद्घाटन


संजय भरदुक  प्रतिनिधी मंगरूळपीर

  16 मार्च 24 मंगरूळपीर शहरातील चौबुजी हनुमान मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता डोमशेड चे उद्घाटन झाले.या उद्घाटनासाठी मा. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री महादेवराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान मंदिरातील मूर्ती चे पूजन करून नंतर सदानंद महाराजांच्या मुर्ती चे पूजन केले .तसेच बालाजी मंदिर पूजन करून . नंतर स्वागत समारंभ चा कार्यक्रम सर्व भाजपा व शिवसेना पदाधिकारी यांचा हार व गुच्छ देवून सर्व पदाधिकारी चे मंदिर समितीचे वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

नंतर डोमशडेचे भुमीपूजन पूजन करून उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रम साठी शहरातील जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तालुका प्रमुख मनिष गहूले,शहर प्रमुख गणेश बजाज, इतर पदाधिकारी उपस्थित होते.तसेच भाजपाचे शामभाऊ खोडे, सुनिल भाऊ मालपाणी, अनिल भाऊ गावंडे, सचिन पवार, दामोदर लुंगे काका,दर्याव मुंढरे, बाळकृष्ण राऊत साहेब,सचिन भाऊ सोळंके, मुकेश शिंदे, विवेक भाऊ सरजोशी, गणेश लुंगे.तसेच इतर सर्व सदस्य व परिसरातील भाविक भक्त मंडळी, आरती मंडळ, उपस्थित होते.