सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने गौरव पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी/ प्रशांत सोनवणे
कोळकी(फलटण): सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने रविवार दि.17 मार्च रोजी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव ता.महाबळेश्वर सातारा यांच्या वतीने गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 2023 - 24 च्या तीन आदर्श शिक्षण संस्थासह राज्य शासनाच्या(शिक्षण विभाग ) वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री 'माझी शाळा,सुंदर शाळा' उपक्रमात पुरस्कार प्राप्त सातारा जिल्हा तीन शाळा व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी तीन शाळांचा गौरव पुरस्कार देऊन विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात अल्प कालावधीत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत नावलौकिक मिळवलेल्या कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज ने मुख्यमंत्री, माझी शाळा ,सुंदर शाळा उपक्रमामध्ये तालुकास्तरीय मुल्यांकनात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रमुख पाहुणे मा.आ.श्री.विजय गव्हाणे,सह कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणे तसेच मा.श्री.विजयराव कोलते, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ पुणे, व मा.श्री.अशोकराव थोरात अध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ सातारा, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांच्या हस्ते प्रशालेस गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड , प्राचार्य अमित सस्ते,पर्यवेक्षिका सौ.माधुरी काटकर आणि प्रशालेचे ग्रंथपाल श्री.प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रदिप माने,सचिव श्री.विशाल पवार , व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांच्यासह सर्व संचालक व पदाधिका-यांनी प्राचार्य, समन्वयिका , सर्व विद्यार्थ्यी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह सर्व पालकांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.





Social Plugin