Ticker

6/recent/ticker-posts

आमणी येथे वादळी वाऱ्यासह गारपीट


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात आमणी परिसरात दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह गारपीटीने झोडपून काढले त्यामुळे शेतकरी हा पुन्हा एकदा नैसर्गिक संकटात सापडला आहे. दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला अवकाळी पावसाने तालुक्यातील आमणी परिसरात गारपीटीने चांगलेच झोडपून काढले त्यामुळे गहू ज्वारी तिळ कांदा या पिकांना मोठाच फटका बसला आहे गहू ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे कळत आहे

 शेतकऱ्यांच्या तोडांशी आलेले गहू ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जानारा शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र शासन व प्रशासन गाढ झोपेतच असल्याच्या चर्चा शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना आज पर्यंत पिक विमा देखील मिळालेला नाही. या बाबींकडे शासन व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सतत अवकाळी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा येत असल्याने शेतकरी हा पुर्णपणे हवालदिल झाला आहे. सततच्या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्याच्या चिंता दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत त्यामुळे शेतकरी हा पुर्णपणे चिंताग्रस्त झाला आहे.