कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
गेल्या वर्षी नाशिक विभागात पाचही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. धरणाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना ६०० गावखेड्याना करावा लागत असून, १८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षी सरासरी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला नसून पावसाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर झालेल्या बिगर मोसमी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. तसेच धरणातून होणारी आवर्तने त्यामुळे धरण पाणी साठयात झपाट्याने घट झाली असून, यंदा नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई भासत असून आत्ताच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अजून एप्रिल, मे महिना यायचा आहे.
नांदगाव तालुक्यात ४७ गावे व २२२ वाड्यांना एकूण ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ नांदगाव तालुक्याला सोसावी लागत आहे. बागलाण तालुक्यात २२, चांदवड २५, देवळा २२, मालेगाव २३, सिन्नर १३, येवला ३५ या तालुक्यातील गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
.png)




Social Plugin