भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बुथ वाँरियर्स व पदाधिकाऱी बैठक पत्रकार भवन गडचिरोली येथे संपन्न झाली.
ग्रामीण प्रतिनिधी - हितेश मेश्राम
गडचिरोली:- आज दि.१९ मार्च २०२४ रोज मंगळवारी भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने बुथ वाँरियर्स व पदाधिकाऱी बैठक पत्रकार भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डाँ.देवराव होळी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्ष सोपान नैताम,आदी उपस्थित होते.
या बैठकीला खासदार अशोक नेते यांनी बुथ वाँरियर्स यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले सशक्त भारत,स्वावलंबी भारत, विकसित भारत, बनवण्याच्या उदात हेतूने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांनी दिन दलित, शोषित पिढीत, वंचित, अशा शेवटच्या घटकापर्यंत अनेक योजना कार्यान्वित करून पोहोचवण्याचं काम केलं.या दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा फलित आहे.तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नङुा जी यांच्या संकल्पनेतील बुथ जितो चुनाव जितो याप्रमाणे बुथ वाँरियर्स नी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे असे या बैठकीत खा.नेते यांनी सांगीतले
याबरोबरचं पुढे बोलतांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगौरव मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या विकासाचा ध्यास या कार्यकर्तृत्वावर व विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून फीर एक बार मोदी सरकार व अब की बार ४०० सौ.पार असा संदेश देत खा.नेते यांनी बुथ वाँरियर्स यांनी कामाला लागावे असे व्यक्तव्य करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा विजयाचा संकल्प करत फिर एक बार मोदी सरकार,व अब कि बार ४०० सौ.पार याकरिता लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना बैठकी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी बुथ वाँरियर्स या बैठकी दरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना बुथ वाँरियर्स भाजपा पक्ष संघटनात्मक धोरण,संघटनात्मक जबाबदारी, कर्तव्य पार पाडून आगामी येणाऱ्या लोकसभेत भाजपाचा विजय कसा होईल. यावर विशेषतःभर देत बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ वाँरियर्स यांना विस्तृत व उत्कृष्ट संघटनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार डाँ. देवराव होळी,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,यांनी सुद्धा मार्गदर्शन करत या बैठकीचे प्रास्ताविक कि.आ.चे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, संचालन जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे, यांनी केले.





Social Plugin