Ticker

6/recent/ticker-posts

रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - एक दिवसावर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज झाले आहे, रंगपंचमीसाठी शहरातील रहाडी खुल्या करण्यात आल्या असून,  रंगपंचमीसाठी नाशिककर या रहाडीत डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी जोरात तयारीला लागले आहे. रंगपंचमीला नैसर्गिक रंगांना पसंती दिली जात आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळण्याचा आग्रह धरला जात आहे. बीट, तांदूळ पीठ, तसेच वनस्पतींची पाने फुले यांपासून बनविलेले नैसगिक रंगांचा वापर करीत रंगपंचमी साजरी करण्यावर भर दिला जाणार आहे.

नाशिकमध्ये रहाडपरंपरा असल्याने जुन्या नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी पुराणकालीन रहाड खोदण्यात येते. विधिवत मानकऱ्यांकडून पूजन केले जाते. नैसर्गिक रंगांचा वापर करीत रहाडीत धप्पा देत एकेकाला पाण्यात ढकलले जाते. गेल्या काही वर्षांपासून नाशिकची रहाड परंपरा सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे परगावातूनही हौशी तरुणाई रहाडीत डुंबण्यासाठी येत आहेत आणि येथील फोटो अपलोड करीत रंगपंचमी साजरी करीत आहे

तथापि लोकसभा निवडणुकांचे वातावरण असल्याने त्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळी रंगपंचमी उत्सवाला कॅच करीत काही आमिषं किंवा वाटप करतात की काय, यावर पोलिसांची नजर असणार आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.