प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर एक बिर्ला गेट येथे उपजिल्हा शहर प्रमुख दिलीप गायकवाड व मा.नगरसेविका ज्योती दिलीप गायकवाड यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. बिर्ला चौकातील शिव स्मारक आकर्षक अश्या पुष्पांनी सजलेले, शहरात सर्वत्र भगवे झेंडे, सकाळच्या रमणीय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सायंकाळी पारंपरिक पद्धतीने ढोल भगवे झेंडे, भगवे फेटे, भगवी उपरणी यामुळे तयार झालेले भगवामय वातावरण, जय भवानी जय शिवाजी च्या गगनभेदी घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा उलगडणारे पोवाडे अशा उत्साही आणि भगवामय वातावरणात शिवरायांवर साकारलेल्या चित्ररथांसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले आबालवृद्ध अशी भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात शिवजयंती मिरवणूक असा एक दिवसीय व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पदाधिकारी,कार्यकर्ते युवासेनिक,शिवसैनिक यांच्या पुढाकाराने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच खाजदर डॉ श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती शहरवासीयांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, आमदार कुमार एलानी,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र भूल्लर महाराज, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख कलवंतसिंह सहोता(बिट्टूभाई),मा.नगरसेवक अंकुश म्हस्के,उपशहर प्रमूख बाळा श्रीखंडे, युवा सेना प्रविण गायकवाड व समाजसेवक गोपी गायकवाड युवासेना कल्याण जिल्हा सचिव विकी सिंग भुल्लर, सागर उटवाल, भाजप शहरअध्यक्ष प्रदीप रामचंदानी, भाजपा जिल्हा अध्यक्ष जमनु पुरसवानी,महिलावर्ग, पदाधिकारी,कार्यकर्ते युवासेनिक,शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते





Social Plugin