सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अजूनही गप्प ?
गंगाराम उबाळे /मलकापूर पांग्रा
सिंदखेड राजा तालुख्या मध्ये दोन महिन्यापासून एका कंपनीने मलकापूर पांग्रा ते लव्हाळापर्यंत रस्त्याच्या जवळच कडेला मोठे खोदकाम करून कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे विशेष म्हणजे कंपनीला कुठल्याही प्रकारची खोदकाम करण्याची परवानगी दे राजा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली नाही,
तरीसुद्धा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून खोदकाम सुरू ठेवली आहे,याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता काबरा यांच्याशी अनेकदा अनेकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून विनापरवाना खोदकाम सुरू असल्याची माहिती दिली परंतु काबरा यांनी फक्त फोन ऐकण्याचे काम करून कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत केली नाही ?त्यामुळे काबरा यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कंपनीने काही आर्थिक व्यवहार केला तर नाही ना अशी शंका जनमानसामध्ये उपस्थित होत आहे,
दोन महिन्यापासून विनापरवाना रोडवर खोदकाम सुरू असताना अनेक वाहने हे रस्त्याने ये जा करत असताना रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली आहेत,अनेकांचे अपघात झालेले आहे रात्रीच्या वेळेला वाहन बाजूला घेताना खड्ड्यामध्ये जाण्याचा धोका निर्माण होत असल्यामुळे अनेक वाहनाचा अपघात सुद्धा झालेला आहे,त्यामुळे हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे काबरा यांच्या लक्षात असूनही ते गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे,त्यामुळे सदर कंपनी ही दिवसाढवळ्या विनापरवाना रस्त्याच्या कडेला खोदकाम करून रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे खोदत असल्यामुळे अनेक वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे,त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे





Social Plugin