मुकूटबन : नुकतेच मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रम करीता आलेले रेल्वेचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी,नरेश लेकरिया यांना मुकूट बन ग्रामपंचायत व गावकरी च्या वतीने निवेदन देण्यात आले.
मुकूटबन नगरीतील सरपंच सौ मीना जगदीश आरमुरवार ग्रा.म सदस्य शंकर लाकडे, संजय परचाके,अर्चना चिंतावार तंटामुक्ती अध्यक्ष बाळूभाऊ बरशे टीवार,रमेश उद्दकवार,अरुण चिंतावार,गणेश चिंतावार,सामजिक कार्यकर्ते सुरेश मानकर , चक्रधर तिर्थगिरीकर व ग्रामस्थ च्या वतीने निवेदन देण्यात आले.
मुकूटबन वरून जाणाऱ्या प्रत्येक साप्ताहिक एक्स्प्रेस संत्रा - घाची दीक्षाभूमी एक्स्प्रेस पूर्णा पटना तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस चा थांबा मुकूटबनला देण्यात यावा तसेच रेल्वे तिकीट आरक्षण मुकूटबन रेल्वे स्टेशनला सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या वेळी मोठ्या संख्येने मुकूटबन ग्रामपंचायत व ग्रामवासी च्या स्वाक्षरी केलेले निवेदन देण्यात आले.





Social Plugin