Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांना अडथळा ठरणारी झाडे हटवली.


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने या मार्गावरील वाहनांना अडथळा ठरणारी २४ झाडे हटवण्यात येत आहे. धोकादायक झाडे हटवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्य वाहतुकीच्या मार्गात ही झाडे येत असल्याने वारंवार अपघात हॉट होते. दत्तमंदिर, उपनगरनाका, गांधीनगर येथे वाहतुकीला या झाडांमुळे अडथळा निर्माण होत होता. वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तोडण्यात येणाऱ्या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाणार आहे.

या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या मार्गावरुन नाशिकरोडच्या नागरिकांना थेट नाशिकला जाता येते. नाशिक रोड व उपनगरातील हजारो नागरीक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक याच मार्गाने जातात त्यामुळे सकाळी व सायंकाळी हा हमरस्ता जॅम होतो. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात येत आहे.