Ticker

6/recent/ticker-posts

कोणार्क नगर (आडगाव) परिसरात महाशिवरात्री साजरी


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

आडगाव : परिसरातील असलेल्या कोणार्क नगर भागात श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात तसेच इतर परिसरातील महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली, त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदल्या दिवशी रात्रीपासूनच परिसरातील सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती, मंदिरातील पुरोहितांनी मंत्र उपचारात पहाटेपासून पूजा अर्चना सुरुवात करण्यात आली. महापूजा, अभिषेक आरती, मंत्र पुष्पांजली, करण्यात आली तसेच सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वांसाठी अभिषेक करण्यात आला. विधिवत शंकराची पूजा केल्यानंतर सकाळी दहा वाजता केळी, साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले. 

रात्री उशिरापर्यंत महिलांनी भजन व हरीपाठाचे पठण केले. याप्रसंगी परिसरातील विविध सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.