प्रतिनिधी/ प्रशांत सोनवणे
दि.०९ कोळकी, फलटण – प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक १० मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी करण्यात आले आहे अशी माहिती सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ .संध्या गायकवाड यांनी दिली. रक्तदान शिबिर रविवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण येथे होणार असून रक्तदान शिबिरासाठी परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांच्या श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटण व रक्षक रयतेचा परिवार यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे .रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला आकर्षक प्रोत्साहन पर भेटवस्तू दिली जाणार असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सौ.संध्या गायकवाड यांनी केले आहे.





Social Plugin