Ticker

6/recent/ticker-posts

आटपाडी तालुक्यातील २० गावांचा डोंगरी विभागात समावेश

 


सागर सोहनी ( ग्रामीण प्रतिनिधी )

शासनाने आटपाडी तालुक्यातील २० गावांचा डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे. उपगट डोंगरी तालुका म्हणून आटपाडी चा समावेश झाला असून डोंगरी विकास योजनेतून या गावांच्या विकासाचा नवा अध्याय चालू होईल अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.तसेच खरसुंडी झरेसह अन्य गावांच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

               आटपाडी तालुक्यातील औटेवाडी, कामत, कानकात्रेवाडी, चींचाळे, घरनिकी,घाणंद , विभुतवाडी, जांभूळणी, धावडवाडी, नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बु, मुढेवाडी, वाक्षेवाडी, वलवण, बाळेवाडी, मानेवाडी, मिटकी, तळेवाडी,हिवतड,या गावांचा डोंगरी विकासामध्ये समाविष्ट केलेला आहे.या गावांचा समावेश डोंगरी विकास योजनेत झाल्यामुळे आता या भागात मूलभूत सुविधा गतीने वाढतील.